पिक कर्ज योजना महाराष्ट्र 2021 - माहिती व ऑनलाईन अर्ज | Pik karj yojana Maharashtra 2021

पीक कर्ज योजना २०२१ संपूर्ण माहिती व जिलहयानुसार पीक कर्ज मागणी अर्ज (पीक कर्ज ऑनलाईन अर्ज) ची लिंक दिलेली आहे. Pik karj yojana Maharashtra 2021 online application.


Table of Content (toc)


पीक कर्ज योजना महाराष्ट्र 2021 - माहिती व ऑनलाईन अर्ज, Pik karj yojana Maharashtra 2021


पिक कर्ज योजना महाराष्ट्र 2021 | Pik karj yojana Maharashtra 2021


पीक कर्जाची माहिती 

Pik Karj Information in Marathi

राज्य शासनामार्फत विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपये (₹३,००,०००) मर्यादेपर्यंतच्या कर्जावर सरसकट ३% व्याज सवलत मिळेल. 

तसेच केंद्र शासनामार्फत ही ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड शेतकऱ्याने मुदत कालावधीत केल्यास अजून ३% व्याज सवलत देण्यात येते. 

अर्थात आता सन २०२१ - २२ पासून शेतकरी बांधवांनी तीन लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदतीच्या कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सर्व शेतकऱ्यांना एकूण ६% व्याज सवलत मिळणार. याचाच अर्थ असा कि सदरचे पिक कर्ज ०% व्याज दराने आपल्याला उपलब्ध होणार आहे. 

अट फक्त इतकेच की घेतलेल्या पीक कर्जाची तुम्ही वेळेत परतफेड करत असाल तर तुम्ही यासाठी पात्र आहात. 

पीक कर्जाच व्याज माफ असल्याने या गोष्टीचा होणारा आपल्याला फायदा म्हणजे असा की कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक गोष्टींसाठी जसे की बियाणे, खते, औषधे खरेदी करण्यास आणखी मदत होईल. 

आणि दुसऱ्या अंगी, व्याज सवलत मिळवण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची दिलेल्या मुदतीमध्ये परतफेड करतील. ज्याने बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.



पिक कर्ज योजनेची प्रक्रिया

Crop Loan in Maharashtra 2021

  • अर्ज पाठविल्यानंतर दोन दिवसात तो संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचेल. त्यानुसार अर्जदार पीक कर्जासाठी पात्र आहे किंवा नाही, याची खात्री केली जाईल. 
  • पात्र शेतकऱ्यांना बँकेतून फोन येईल. फोन आल्यानंतर बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल. 
  • कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येईल.


पीक कर्ज ऑनलाईन अर्ज (पीक कर्ज मागणी अर्ज) 

Pik Karj Yojana Online Application

शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या नाव समोरील लिंक वर क्लिक करून सदर झालेल्या फॉर्म मध्ये काळजीपूर्वक व व्यवस्थित माहिती भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्यक आहे. 

अपुरी माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारण्यात येणार नाही. तुम्ही तुमच्या बद्दल खरी माहिती द्यावी. माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल.

पूर्ण फॉर्म इंग्लिश मध्येच भरावा


पीककर्ज मागणीसाठी भरावयाचा अर्ज २०२१-२०२२ 

Pik Karj Online Form Links