शेती कर्जाचे प्रकार - भारतात मिळणारे विविध कृषी कर्जाबद्दल आजच जाणून घ्या. Agriculture Loan in India

भारत एक शेती प्रधान देश आहे. शेतीच्या प्रगतीसाठी अनेक कृषी कर्ज पुरवले जातात. अनेक बँका आणि वित्तीय संस्था आहेत ज्या शेतकर्यांना शेती कर्ज देतात जेणेकरून शेतकरी त्यांची शेती अधिक जोमाने व कार्यक्षमतेने करू शकतील. या मिळालेल्या कर्जाचे तुम्ही बियाणे, खते, सिंचनाचे पाणी, कीटकनाशके आणि शेतीशी संबंधित बरेच काही खर्च भागवू शकता. 


तर आज आपण भारतातील विविध शेती कर्जाचे प्रकार, कृषी कर्ज योजना, त्यांची पात्रता, योजनेचा फायदा, व्याज दर इत्यादी गोष्टींबद्दल संक्षिप्त मद्ये जाणून घेऊया. 


Table of Content (toc) 


शेती कर्जाचे प्रकार, Types of Agriculture loan in India


शेती कर्जाचे प्रकार (कृषी कर्ज योजना) - पात्रता, योजना, व्याज दरकृषी कर्जाचे प्रकार - Agriculture Loan Scheme 

शेतकर्यांना शेतीत प्रगती करण्यासाठी अनेक प्रकारचे कर्ज मिळतात. या कर्जाचा वापर व हेतू लक्षात घेता आपण त्यांची ३ मुख्य गटांमध्ये विभागणी करू शकतो. 

 1. पिक कर्ज योजना महाराष्ट्र (Working Capital) 
 2. मुदत कर्ज (Investment Loan / Term Loan) 
 3. माल तारण कर्ज (Pledge Loan)१. पिक कर्ज योजना महाराष्ट्र (Working Capital) 

शेती करण्यासाठी जे खर्च प्रत्येक वर्षी एका शेतकऱ्याला करावे लागतात, त्यासाठी बँकेतून मिळणाऱ्या कृषी कर्जाला (Agricultural Loan) आपण पिक कर्ज (Working Capital) असे म्हणतो. 

बि-बियाणे, खते, आंतरमशागती, औषधे याकरीता होणाऱ्या खर्चासाठी आपल्याला पिक कर्ज भेटते. अर्थात पिकासाठी कराव्या लागणाऱ्या जमिनीच्या मशागतीपासून ते पिकाच्या कापणीपर्यंतचा जेवढा पण खर्च येतो, तो या पिक कर्जामध्ये मोडतात. 

याचे खास वैशिष्ट म्हणजे हे कि बँकेद्वारा मंजूर झालेल्या रकमेतून तुम्ही हे पिक कर्ज वर्षातून गरजेनुसार अनेकदा काढू शकता व परत भरू ही शकता. म्हणजे बँकेने दिलेल्या मुदती दौरान तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्ज काढा, गरज नसल्यास ती रक्कम जमा करा व नंतर मुदतीच्या कालावधीत गरज आढळल्यास तेच पैसे काढून परत मुदत संपण्या पुर्वी भरू शकता. तुम्ही जेव्हा पैसे पिक कर्ज खात्यामध्ये भरून ठेवता तेवढ्या रकमेच तुमचं व्याज वाचत. 

पीक कर्जाची मुदत एक ते तीन वर्ष किंवा पाच वर्ष असू शकते. 

पिक कर्ज: पीक पद्धतीनुसार ६ महिने किंवा एका वर्षातून एकदा कर्जाची रक्कम व्याजासहित भरून नवजून करणे (फिरवून घेणे) आवश्यक असते. याची मुदत ३ ते ५ वर्ष असते. 

उदाहरणार्थ, 

तुम्ही ₹१,००,००० कर्ज काढले. 

त्यावर एका वर्षाचे १०% व्याज आहे, म्हणजे ₹१०,०००.

एकूण रक्कम झाली ₹१,१०,००० रुपये, 

ती तुम्हाला एका वर्षात पूर्णपणे भरायची आहे.

ती भरल्यानंतर तुम्ही तुमच्या गरज, पीक व पात्रतेनुसार त्याच्यातले एक लाख परत काढू शकता. व्याज परत भेटत नाही. या हेरा-फेरीला नवजून किंवा फिरवून घेणे असे म्हणतात. २. मुदत कर्ज (Investment Loan / Term Loan) 

शेतीसोबत अनेक संलग्न उपक्रम आणि प्रकल्प आहेत ज्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता आसते. हे सिंचन, पाइपलाइन, पोल्ट्री, डेअरी फार्म, असू शकते. 

एखादा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी किंवा शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी जे शेती कर्ज काढले जाते त्याला आपण 'मुदत कर्ज' असे म्हणतो. उदाहरणार्थ - सिंचन कामे, पाईपलाईन, पोल्ट्री, गाई - म्हैस खरेदी करायच्या असतील, ट्रॅक्‍टर व इतर शेती अवजारे खरेदीसाठी तुम्हाला मुदत कर्ज मिळते. 

या गोष्टींसाठी सुरुवातीलाच खर्चाची गरज असते, जी तुम्हाला मुदत कर्जा मार्फत भेटते. यामध्ये आपल्याला पिक कर्जा सारखी सुविधा नसते. इथे तुम्ही एकदा कर्ज खात्यामध्ये पैसे जमा केले कि ते परत काढू शकत नाही. 

या कर्जाची साधारणतः तीन ते सात वर्ष मुदत असते. ही मुदत तुम्ही कोणत्या प्रकारच कर्ज काढलं आहे आणि तुमची पीक प्रणाली काय आहे यावर अवलंबून असते. 

मुदत कर्ज याची मुदत ३,५ किंवा ७ वर्ष असून तुमच्या उत्पादन चक्रानुसार समान हप्ते करून दिले जातीत. 

विविध प्रकल्पांच्या हप्त्याची कालावधी काही अशा प्रकारे असू शकते: उदाहरणार्थ 

 • डेरी साठी - मासिक 
 • पोल्ट्रीसाठी - तीमाही, 
 • ट्रॅक्टर - सहामाही
 • पाईपलाईन/ केळी/ ऊस व इतर गोष्टींसाठी - वार्षिक हप्ते असतात. 

अशा प्रकारे मुदत कर्ज यामध्ये तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता. 


३. माल तारण कर्ज (Pledge Loan)

एखादी मालमत्ता तारण ठेवून अर्थातच गहाण ठेवून जे कर्ज आपल्याला मिळते त्यास माल तारण कर्ज म्हणतात. दैनंदिन जीवनातील उदाहरण म्हणजे सोनेतारण कर्ज. त्यामध्ये सोने गहाण ठेवून तुम्हाला ठेवलेल्या सोन्याच्या मूल्यांकनानुसार रक्कम भेटते. तसेच मका, बेदाना, काजू, सोयाबीन, व इतर पिके आहेत जी तुम्ही बँकेकडे गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. 


या कर्ज विभागांमध्ये मोडणारे अनेक शेती कर्जाचे प्रकार खालील प्रमाणे आहेत:

 • पीक कर्ज / किसान क्रेडिट कार्ड
 • कृषी मुदत कर्ज 
 • कृषी कार्यरत भांडवल कर्ज 
 • शेती यांत्रिकीकरण कर्ज 
 • कृषी सुवर्ण कर्ज 
 • फलोत्पादन कर्ज 
 • वनीकरण कर्ज 
 • विविध कामांसाठी कर्ज.शेती कर्जाचे उद्दीष्ट काय? 

शेती कर्जाचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कमी व्याजाने आर्थिक हातभार लावणे जेणेकरून ते त्यांच्या शेतीच्या कामात प्रगती करतील. 


कृषी कर्जाचे फायदे

 • आपल्याला कमी व्याजदरासह सहज कर्ज मिळेल.
 • कामी कागदपत्रांची आवश्यकता 
 • जलद कर्ज मंजूरी
 • परतफेड करण्याच्या क्षमतेनुसार लवचिक अटीकृषी कर्जासाठी पात्रता 

Agriculture Loan Eligibility

तुम्ही निवडलेल्या कर्ज योजनेच्या प्रकारावर आधारित कृषी कर्ज घेण्यासाठी पात्रता निकष बदलू शकतात. तथापि, सामान्यीकृत पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत: 

 • अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षे असावे. 
 • व्यक्तीकडे आवश्यक मालमत्तेची मालकी असणे आवश्यक आहे. 


कृषी कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

Documents Required For Agriculture Loan

 • कर्ज घेण्याचा अर्ज 
 • केवायसी (KYC) दस्तऐवज 
 • मालमत्ता दस्तऐवज, जे कर्जासाठी सुरक्षा म्हणून काम करतील. 
 • इतर विशिष्ट कर्ज संबंधित कागदपत्रे


शेती कर्जासाठी अर्ज कसा करावा? 

How to get agriculture loan? 

कृषी कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम तुम्हाला संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज किंवा योजनेविषयी सर्व तपशीलांची चौकशी करणे आवश्यक आहे. 

सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करा. नंतर कर्जासाठी फॉर्म भरा, कागदपत्रे जमा करा आणि त्या बँकेच्या कार्यपद्धतीनुसार पुढची वाटचाल करा. 

लवकरच ते तुमचे कर्ज मंजूर करतील जेणेकरून तुम्ही तुमच्या शेतात प्रभावीपणे काम करू शकाल.


भारतातील कृषी कर्जाचे व्याज दर 

Agriculture Loan Interest Rate 

शेतकऱ्याकडून हंगामी कृषी ऑपरेशन्स किंवा पशुपालन, मत्स्यपालन किंवा जमीन किंवा शेतीची साधने खरेदी यासारख्या संबंधित क्रियाकलापांना निधी देण्यासाठी कृषी कर्ज घेतले जाते. शेतकरी 7% प्रति वर्ष पासून सुरू होणारे कृषी कर्ज घेऊ शकतात. आणि कर्जाच्या रकमेच्या 0 ते 4% च्या दरम्यान प्रक्रिया शुल्कासह. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 13.25% पर्यंत 

स्टेट बँक ऑफ इंडिया: 7.25% प्रति वर्ष व अधिक

IDBI बँक: 7% प्रति वर्ष व अधिक
अस्वीकरण: येथे प्रदान केलेली माहिती अचूक असल्याची खात्री करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. तथापि, डेटाच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी दिली जात नाही. कृपया कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योजना माहिती दस्तऐवजासह सत्यापित करा.