पशुसंवर्धन कर्ज योजना Pashusavardhan Karj Yojana काय आहे? आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होणार? जाणून घ्या या लेखामध्ये.
Table Of Content (toc)
विविध पशुसंवर्धन कर्ज योजना | Pashusavardhan Karj Yojana
पशुसंवर्धन कर्ज योजना काय आहे?
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतामध्ये शेती आणि पशुपालन यांना एक विशेष महत्त्व आहे. आपण या आधीच्या लेखांमध्ये पाहिले की शेतीसाठी विविध प्रकारचे कर्ज योजना आहेत. तसेच पशु पालन व पशुसंवर्धन यासाठीही सरकारद्वारे अनेक कर्ज योजना दिल्या जातात.
नवीन पिढी पशुपालन हा फक्त एक जोड धंदा न पाहता यालाच एक खूप मोठा व्यवसाय समजतात. म्हणूनच पशुपालनाला वाढ देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना व पशुपालकांना विविध योजना अंतर्गत अनुदान व इतर गोष्टींमध्ये मदत करतात. या योजनांना पशुपालन कर्ज योजना म्हटलं जाता.
तर आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्रामध्ये मिळणार्या विविध प्रकारच्या पशु संवर्धन कर्ज योजना व त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आणि या पशुपालन कर्ज योजनेचा तुम्हाला काय फायदा आहे? हे ही मी तुम्हाला सांगणार आहे. तर या विषयी माहिती साठी हा लेख संपूर्ण वाचा.
विशेष घटक योजना
या योजनेअंतर्गत दोन प्रकारे अर्ज करता येतो
दुधाळ गट वाटप - २ गायी किंवा २ म्हशी साठी
शेळी गट वाटप - १० शेळी + १ बोकड
लाभार्थी: नवबौद्ध, अनुसूचित जाती - ७५% अनुदान
नाविन्यपूर्ण योजना
२०११-१२ पासून नाविन्यपूर्ण योजना सुरु झाली. या योजनेअंतर्गत तीन गट आहेत
- शेळी गट
- दुधाळ गट
- कुक्कुटपालन गट
शेळी गट वाटप - १० शेळी + १ बोकड
दुधाळ गट वाटप - २ संकरित गायी किंवा २ म्हशी साठी
कुकूटपालन गट वाटप - १००० मांसल पक्षी
लाभार्थी:
अनुसूचित जाती / जमाती - ७५% अनुदान
सर्वसाधारण प्रवर्गासाठी - ५०% अनुदान
आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी योजना
या योजनेअंतर्गत तुम्ही दोन प्रवर्गासाठी अर्ज करू शकता
दुधाळ गट वाटप - २ संकरित गायी / देशी गायी किंवा २ म्हशी
शेळी गट वाटप - १० शेळी + १ बोकड
लाभार्थी:
फक्त अनुसूचित जाती / जमाती साठी - ७५% अनुदान
विशेष घटक योजना सामूहिक चर्चासत्राचे आयोजन
पशुसंवर्धन विभागातर्फे विशेष घटकांच्या जमातींसाठी अनेक चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. यामध्ये तज्ज्ञ पशुवैद्यक पशुपालन विषयी व इतर गोष्टींबद्दल माहिती प्रदान करतात.
मराठवाडा योजना
मराठवाडा योजना ही केंद्र शासनाची एक विशेष योजना आहे. या योजनेअंतर्गत आपण दोन प्रकारे अर्ज करू शकतो.
दुधाळ गट वाटप - २ गायी किंवा २ म्हशी
शेळी गट वाटप - २० शेळी + २ बोकड
लाभार्थी: सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% अनुदान
कुक्कुट विकास कार्यक्रमा अंतर्गत एक दिवशीय पक्षांचे वाटप / तलंग गटाचे वाटप
कुक्कुट विकास कार्यक्रमाअंतर्गत १०० एक दिवशीय पिल्लांचे वाटप केले जाते.
गिरीराजा, वनराजा, RIR अशा प्रजातींचा पक्ष्यांचा यामध्ये समावेश असतो.
कॅटल फिड स्कीम
या स्कीम मध्ये खालील योजना येतात
- वैरण विकास योजना
- मुरघास युनिट योजना
- कडबा कुट्टी योजना
लाभार्थी: सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% अनुदान
(या योजनेत सर्व प्रवर्गाचे पशुपालक अर्ज करू शकतात)
चाफ कटर / मुरघास (साइलेज) प्रक्रिया अनुदान
पशुपालन करताना पाळलेल्या पशुंसाठी १२ महिने हिरवा चारा उगवणे एक मोठी गोष्ट असते. म्हणूनच पशुपालकांना आधार देण्यासाठी पशुसंवर्धन खात्यातर्फे मुरघास युनिट किंवा चाप कटर यासाठी ५०% अनुदानावर ही योजना राबवली जाते.
पशुसंवर्धन कर्ज योजने साठी लागणारी कागदपत्रे
- फोटो
- आधार कार्ड
- दारिद्र रेषेखालील दाखला (optional)
- ७/१२
- ८ अ चा उतारा किंवा ग्रामपंचायत नमुना ८
- पशुपालन प्रशिक्षण सर्टिफिकेट
- जातीचा दाखला
- बचत गटाचा दाखला
- रोजगार किंवा स्वयंरोजगार कार्ड
- अपत्य दाखला
- रेशन कार्ड
सर्वसाधारणपणे ही सर्व कागदपत्रे तुम्हाला पशुसंवर्धन कर्जचा अर्ज भरताना द्यावे लागतात.
पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया
पशुसंवर्धन कर्ज भेटण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याजवळील पशुचिकित्सालय मधून अर्ज घ्यावा लागेल. तो अर्ज भरून त्यासोबत वरील कागदपत्रे जडून भरलेला अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करा.
पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठी लागणारा खर्च
जर तुमचे सर्व कागदपत्रे आधीपासून तयार असतील तर या योजनांसाठी कोणताही खर्च होत नाही.
अद्यापि तुमची कागदपत्र नसल्यास गरजेची कागदपत्रे बनवून घेण्यासाठी व त्यांची जमवाजमव करून त्यांचे झेरॉक्स मारण्यासाठी जो खर्च येईल, तेवढाय खर्च तुम्ही गृहीत धरू शकता. या व्यतिरिक्त दुसरा कोणताही खर्च येत नाही.
अर्ज भरण्यासाठी सुरुवात कधी होते व शेवटची तारीख काय?
पशुसंवर्धन कर्ज योजनांचा अर्ज भरण्यास जुलै महिन्यात सुरूवात होतात व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये त्यांची अंतिम तारीख निश्चित केलेली असते.
प्रत्येक विभागासाठी वेगळी नोटीस असते आणि त्या नोटीस प्रमाणे तारखा असतात. तर तुमच्या विभागाची तारीख जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळील पशुसंवर्धन विभागाशी संवाद साधा.